Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्र दारू पी म्हणतोय, तुम्ही काय कराल? MPSCच्या परीक्षेत प्रश्न, पर्याय वाचून येईल हसू

मित्र दारू पी म्हणतोय, तुम्ही काय कराल? MPSCच्या परीक्षेत प्रश्न, पर्याय वाचून येईल हसू
 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ ची परीक्षा घेतली. या परीक्षेत दारूबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तुम्हाला मित्र दारु पिण्यासाठी आग्रह करत असेल तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला होता. याशिवाय तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांचा त्रास झाल्यास काय कराल असाही प्रश्न होता. या दोन प्रश्नांची चर्चा विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात होत आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना प्रशासकीय सेवा करायची असते. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. अशा वेळी त्यांना दारूबद्दल असा प्रश्न विचारून एमपीएससीला काय अपेक्षित आहे असा प्रश्न परीक्षार्थींकडून विचारले आहेत.अशा प्रकारचे प्रश्न टाळायला हवेत अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. तर एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी यावर दारुच्या प्रश्नाबद्दल माहिती घेण्यात येईल. त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देता येईल असं म्हणत बोलणं टाळलं.



काय होता प्रश्न
एमपीएससीने दोन्ही पेपरमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न दारू पिण्याविषयी विचारण्यात आला आहे. यामध्ये तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचं नसेल तर त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरासाठी (१) मी माझ्या मित्रांना सांगेन की, माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे. (२) दारू पिण्यास नकार देईन, (३) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन. (४) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे. असे चार पर्याय देण्यात आले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.