बाजारात 350 आणि 5 रुपयांची नोट आलीय? व्यवहार करण्याआधी RBI काय म्हणाले पाहा
मुंबई : RBI ने नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणल्या. त्यानंतर 2000 रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ जुन्या नोटा चलनातून काढण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. तर 200 च्या नोटाही चलनात कमी आहेत.
त्याही कमी करण्याकडे कल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता मार्केटमध्ये 350 आणि 5 रुपयांच्या नव्या नोटा आल्याची चर्चा सुरू झालीय. बाजारात 350 आणि 5 रुपयांच्या नोटा आल्यात अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. RBI ने 350 आणि 5 रुपयांची नोट मार्केटमध्ये आणली आहे असा, सध्या एक मेसेजही व्हायरल होत आहे. या नोटा पाहून अनेकांचा संभ्रम निर्माण झाला. खंरच RBI ने या नोटा बाजारात आणल्या आहेत का? याबाबत जाणून घेऊया.
2000 ची नोट चलनातून बाद
फाटलेल्या नोटांमुळे निर्माण झालेली पोकळी रिझर्व्ह बँक भरून काढतेच, शिवाय गरज पडल्यास नवीन नोटाही जारी करते. 2016 च्या नोटाबंदीनंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या. त्यानंतर भारतात 200 रुपयांच्या नवीन नोटाही चलनात आणल्या.
350 रुपयांच्या नोटचं सत्य
2023 मध्ये, रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. आता चलनात 500 रुपयांची मोठी नोट आहे. आता,350 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्केटमध्ये RBI ने आणल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर फिरणारे हे फोटो नवे नाहीत. तीन वर्षांपूर्वी सुद्धा असेल मेसेज व्हायरल झाले होते. RBI ने सध्या अशा कुठल्याही प्रकारच्या नोटा बाजारात आणलेल्या नाहीत. तुम्ही अशा नोटा घेतल्या किंवा तुमच्यापर्यंत आल्यास तातडीनं तक्रार दाखल करा.
चलनात किती प्रकारच्या नोटा
या नोटा बनावट असून या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा नोटा घेतल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशा नोटा तुम्हाला कुठेही दिसल्या तर तातडीनं तक्रार दाखल करा. सध्या 5, 10,20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा आहेत. 5 रुपयांच्या नोटा अस्तित्वात असल्या तरी, 5 रुपयांच्या नवीन डिझाइनच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेने 2 आणि 5 रुपयांच्या नोटा छापणे बंद केलं आहे. फक्त बाजारात असलेल्या नोटा कायदेशीर चलन म्हणून राहतील असं सांगितलं होतं. त्यामुळे अशा कोणत्याही नोटा तुमच्यापर्यंत आल्यास त्या बनावट आहेत का याची तपासणी करा.
RBI ने दिली महत्त्वाची माहिती
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रत्येक नोटा (5, 10,20, 50, 100, 200 आणि 500), जोपर्यंत चलनातून काढून घेतल्या जात नाहीत, त्या भारतात कुठेही कायदेशीर चलन म्हणून वापरल्या जातील किंवा त्यामध्ये व्यक्त केलेल्या रकमेसाठी पैसे म्हणून वापरल्या जातील आणि आरबीआय कायदा, १९३४ च्या कलम २६ च्या उप-कलम (२) च्या तरतुदींनुसार केंद्र सरकारकडून हमी दिली जाईल," असे आरबीआयने म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.