38 वर्षांचा माणूस; आतापर्यंत जे बोलला ते खरं निघालं, 2025 साठी केली धक्कादायक भविष्यवाणी
संपूर्ण जगभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. पण नवीन वर्ष कसं जाणार, जगासाठी नवीन वर्ष कसं असणार? हे जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांना आहे. बाबा वेंगाने 2025 साली जगावर मोठं संकट येण्याची भविष्यवाणी केली आहे.
यानंतर आता एका 38 वर्षांच्या व्यक्तीनेही या वर्षाबाबतचं भविष्य वर्तवलं आहे. या व्यक्तीने आतापर्यंत जी भविष्य वर्तवली आहेत, ती खरी ठरली आहे. याच व्यक्तीने 2018 सालीच जगावर कोरोनासारखं संकट येईल, असं भविष्य सांगितलं होतं. आता याच व्यक्तीने 2025 सालासाठीचं हैराण करणारं भविष्य सांगितलं आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार लंडनमध्ये राहणाऱ्या हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुलाने जगासाठी धोकादायक अशी भविष्यवाणी केली आहे. 2025 साली तिसरं महायुद्ध होईल, हे वर्ष असं असेल जिकडे करुणा असणार नाही. धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांचे गळे कापतील. राजकीय हत्या होतील, असा दावा निकोलसने केला आहे.
नव्या वर्षी लॅबमध्ये अंगांची निर्मिती होईल, खूप जास्त पाऊस पडेल, विनाशकारी पूर येईल, ज्यामुळे लाखो घरांचं नुकसान होईल. लाखो लोक बेघर होतील. समुद्राचा जलस्तर जलद गतीने वाढेल, ज्यामुळे अनेक शहरं बुडतील. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं राजकीय पतन होईल. जगात महागाई जलदगतीने वाढेल. एवढच नाही तर ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि हॅरी यांच्यात समेट होईल, असं भविष्यही निकोलसने वर्तवलं आहे.
निकोलसच्या किती भविष्यवाणी अचूक?
आपण 17 वर्षांचे होतो तेव्हापासून स्वप्नात कुणीतरी येतं आणि भविष्याविषयी सांगतं. या स्वप्नाच्या आधारावरच आपण भविष्य वर्तवतो, असा दावा निकोलसने केला आहे. निकोलस औजुलाने अमेरिकेतलं सगळ्यात मोठं आंदोलन ब्लॅक लाईव्हस मॅटर, डोनाल्ड ट्रम्पचा विजय, आर्टिफिशियल इंटलिजन्समध्ये वाढ, नोट्रे डेम आग, कोरोना, रोबोट आर्मी याबाबत अचूक भविष्यवाणी केली होती.
केव्हा चर्चेत आला?
मी पौगंडावस्थेत असतानाच आपल्याकडे असलेल्या मानसिक क्षमतेबद्दल मला जाणवलं. काही दिवस मी कोमामध्ये गेलो. कोमामध्ये असताना मला मागच्या जन्मातल्या गोष्टी दिसायला लागल्या. मी इजिप्तमध्ये एक राणी होतो, चीनमध्ये मी एक टेलर म्हणून काम करत होतो. हिमालयात मी नन होतो. आफ्रिकेमध्ये माझा जन्म जादूगार म्हणून झाला. त्यानंतर माझा जन्म सिंहाच्या रुपातही झाला. मृत्यू अंत नाही, कारण आत्मा कधी मरत नाही, आम्ही परत जन्म घेतो, असे दावेही निकोलस औजुलाने केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.