Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तोंडात रेजर ब्लेड अन् मुळशी स्टाईल कोयत्याने तरुणाला संपवलं, कोल्हापुरात अल्पवयीन रील्स गुंडांची गँग

तोंडात रेजर ब्लेड अन् मुळशी स्टाईल कोयत्याने तरुणाला संपवलं, कोल्हापुरात अल्पवयीन रील्स गुंडांची गँग
 

कोल्हापूर : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलांची गँग धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवत असल्याचं उघड झालं आहे. एवढंच नाहीतर स्टेट्स ठेवून एका अल्पवयीन मुलाची हत्याही करण्यात आली. या प्रकरणी 3 जणांना अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

 

स्टेटस ठेऊन दहशत माजवत खून करण्याचे प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. तलवारी, एडका आणि ब्लेड अशी हत्यारे व्हिडीओमध्ये दाखवत सोशल मीडियावर दाखवून उघडपणे गुंडगिरी सुरू आहे. हे अल्पवयीन मुलं शस्त्र आणि पिस्तुली रिल्समध्ये दाखवून दहशत पसरवत आहे. BK COMPANY असं या पोरांच्या टोळीचा ग्रुप आहे. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली ही पोरं कोयते घेऊन रस्त्यावर कुठे गाडी अडवत आहे. तर कुणी पिस्तुली घेऊन दुचाकीवर दमदाटी करत आहे. एवढंच नाहीतर, रील्स बनवून उघडपणे शिवीगाळ करून धमकीही देत आहे.

अल्पवयीन गँगने तरुणाची मुळशी स्टाईल केली हत्या

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा खून करण्यात आला. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने विठ्ठल शिंदे याच्यावर कोयत्याने सपासप वार करून निघृणपणे हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या तीन तासात पोलिसांनी छडा लावला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पोलिसांनी जेरबंद केलं होतं. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गांधीनगर आणि करवीर पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे. मात्र हत्येचा नवा प्रकार समोर आला आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.