येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत
मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे,
त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
जाहीर सभेतून केलंय. साईनगरी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत
होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण समाजातील घटकांसाठी सुरू केलेल्या घटना शेवटपर्यंत सुरू राहणार आहेत. संघटनेला सरकारसोबत समर्थन करावं लागेल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मी हात जोडून विनंती करतो की, आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे. मंत्रालयात समाजातील कामं घेवून या. विनाकारण येवू नका, असं देखील फडणवीस म्हणालेत.
विकासाची कामं करायची आहेत, 25-15 सामान्य लोकांच्या जीवनातील दु:ख दूर करण्याचं साधन आहे. भारतीय जनता पक्षाची संस्कृती आपण सर्वांनी लक्षात ठेवावं असं आवाहन फडणवीसांनी केलंय. येत्या काळात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याकरत एक पारदर्शी चालणार सरकार आणि त्यामागे हिमालयासारखी उभी असणारी संघटना अशी प्रतिमा करायची आहे.लोकसभेच्या काळात संविधानविरोधी शक्ती, अराजकता शक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला. आपल्या विरोधकांना लक्षात आलं की, मोदींजींना पराभूत करता येत नाही. त्यावेळी त्यांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या निवडणुकीत आपण त्यांना पूर्ण ताकदीनं पराभूत केलंय. पण त्यांच्या कारयावा संपल्या नाहीत. अलीकडच्या काळात बांग्लादेशी घुसखोर कागदपत्रांसोबत सापडत आहेत. वोट जिहाद सुरू झालंय, त्यामुळं आपल्याला लढाई अजून घट्ट करावी लागेल. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. एक है तो सेफ है, असा मंत्र मोदीजींनी दिलाय. सगळ्या समाजाला घेवून आपल्याला पुढे जायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.