बदलापूर येथे एका मित्राने त्याचा मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब पीडित पत्नीने तिच्या पतीला सांगितल्यावर संतापलेल्या पतीने त्याच्या मित्राच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर तो बाथरूममध्ये पहल्याचा बनाव आरोपींनी रचल्याचे उघड झालं आहे. सुशांत असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर नरेश भगत असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत व सुशांत हे दोघे मित्र होते. मात्र, सुशांतने नरेशच्या पत्नीवर नरेशला जीवे मारण्याची धमकी देत अतिप्रसंग केला.
जर ही बाब कुणाला सांगितली तर तिच्या पतीला म्हणजेच नरेशला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली, नरेशच्या पत्नीने पतीच्या जीवाच्या भीतीने ही बाब कुणाला सांगितली नाही. मात्र, यानंतर देखील सुशांतते नरेशच्या पत्नीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले, या घटनेमुळे नरेशची पत्नी ही त्रस्त झाली होती. सुशांतने तिला धमकावत आणखी तिच्यावर अत्याचार केले. मात्र, हा अत्याचार सहन न झाल्याने अखेर हा प्रकार तिने तिचा पती नरेशला सांगितला, यामुळे नरेश चांगलाच संतापला होता. नरेशने आपल्याला काही माहिती नसल्याचे भासवत सुशांतला १० जानेवारीला घरी बोलवत त्याला दारू पाजली. तो नशेत असतांना सुशांतला नरेशने रात्री घरी थांबून घेतले. यानंतर नरेशने रात्री सुशांतच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केली.
अपघात असल्याचा रचला बनाव
नरेश आणि सुशांतने मद्यपान केल्यावर सुशांतला नरेशने घरी थांबून घेतले. सुषाणात हा झोपला असतांना पहाटेच्या सुमारास नरेशने सुशांतच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर सुशांत हा जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव नरेशने रचला. सुशांत पहल्याने त्याच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असा बनाव नरेशने रचला. हे प्रकरण पोलीसांपर्यंत गेले. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, पोस्टमॉर्टमचे सुशांतचा अपघाती मृत्यू नसून डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार केल्याने झाल्याचे उघड झाले.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे हत्येचा खुलासा
सुशांतच्या मृतदेहाचे पोलिसांनी पोस्टमॉर्टम केले. यात सुशांतचा मृत्यू हा डोक्यावर काही कठीण वस्तूने प्रहार केल्याने झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे पोलिसांनी नरेशला अटक केली. तसेच त्याची चौकशी केली. दरम्यान, त्याला पोलिसी खाक्या दाखवत नरेशने खून केल्याची कबुली दिली. त्याने त्याच्या पत्नीवर कटींचार केल्याने त्याने सुशांतचा खून केल्याची कबुली दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.