Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एम.एस्सी. शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या; 'त्या' दोघांमध्ये वादावादी झाली अन्..

एम.एस्सी. शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या; 'त्या' दोघांमध्ये वादावादी झाली अन्..
 

बंगळूर : सिंधनूरच्या शासकीय महाविद्यालयात  एम.एस्सी.  शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रायचूर जिल्ह्यातील सिंधनुरात घडली. शिफा अब्दुल वाहिद (वय २४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

आरोपी मुबीनने शिफा हिला काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिला फोन केला. यावेळी विद्यार्थिनी  महाविद्यालयामध्ये न जाता मुबीनशी बोलत होती. दोघांमध्ये वादावादी झाली आणि मुबीनने चाकू काढून शिफाचा गळा चिरून पळ काढला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शिफाचा मृत्यू झाला. पोलिस उपाधिक्षक बी. एस. तलवार, ग्रामीण ठाणे मंडळ पोलिस निरीक्षक वीररेड्डी, बालागनूर निरीक्षक यारीप्पा यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी मुबीनने लिंगसुगुरू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.