मुंबईत 41 हत्या करणारा क्रूरकर्मा
तब्बल 60 वर्षापूर्वीची गोष्ट मुंबईच्या उपनगरात घराबाहेर, झोपडयांत फूटपाथवर झोपणाऱ्या लोकांची झोप उडाली होती. लोक रात्र रात्र जागून काढत होते. रात्री झोपलं की सकाळी आपण जिवंत असू, याची खात्रीच वाटत नव्हती झोपेत असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारा क्रूर माथेफिरू शहरात फिरत होता. दहशतवादीच होता तो. त्यामुळे निम्म्या लोकांनी चार पाच तास झोपायचं त्यावेळी उरलेल्या निम्म्या लोकांनी जागं राहून येणाऱ्या-जाणा-यांवर लक्ष ठेवायचं, असा प्रकार सुरू होता. पाच तासानंतर झोपलेले उठून पहारा यापदे आणि जागे लोक झोपायला जायचे असं बराच काळ सुरू होतं
याता कारणीभूत होता मुंबईता हादरवून टाकणारा एक क्रूरकर्मा. ज्याचं नाव होतं रामन राघव. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात 1929 साली जन्मलेला रमन राघव 1995 साली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना मूत्रपिंडं निकामी होऊन पुष्पाच्या रुग्णालयात मरण पावला. तिथल्याच मेरवडा तुरुंगात तो होता रामन राघव हा सायको रामन, वेलुस्वामी, अण्णा, तंबी, सिंधी तलेवी, रिपर अशा नावानं ओळखला जाई. तलेवीचा अर्थ नेता. पण गंमत म्हणजे मुंबई पोलिसांनी त्याचे नाव सिंधी दलवाई केलं पुढे विविध भाषेत त्याच्यावर चित्रपट निघाले. लोकांना रामन राघव हे नाव माहीत झालं.
पण त्याची कृत्य आणि पोलिसांनी केलेला उपाराही माहीत हवा लाखी मुंबईकर भीतीच्या छायेखाली वावरत होते कारण म्हणजे 1965-66 या दोन वर्षांत पूर्व उपनगरांत रात्री उघड्यावर झोपलेल्या 19 जणांवर जीवघेणे हल्ले झाले होते त्या हल्ल्यात जखमींपैकी नऊ जण मरण पावले होते हे हल्ले खून कोण करतंय, का करत आहे. हे कळत नव्हतं. पोलिसांनी एका इसमाला संशयावरून ताब्यात घेतलं होतं वेडसर होता तो. पण त्याने इल्ले केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागेनात. त्यामुळे त्याला सोडून देताना मुंबईबाहेर पाठवलं. तो इराग बहुदा गेला पुण्याला.
मग मुंबई शांत झाली असे हल्ले पूर्णपणे थांबल्यानं हळूहळू सर्व मुंबईकरांना शांत झोप मिळू लागली. हा हल्ल्यांचा विषयही लोकांच्या ठोक्यातून निघून गेला. एरवीही मुंबई लवकर रुळावर येते, त्यामुळे वातावरण शांत झालं मुंबई पोलिसांनीही सुटकेचा नि.श्वास सोडला. दोन वर्ष अतिशय शांततेत गेली. पण संथापित इसमाला मुंबईबाहेर पाठवल्यामुळेच सारं शांत झालं होत, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालं. त्याचाही थांगपत्ता नव्हता. ज्या भागात हल्ले झाले होते. तिथं भीती कायम होती. अचानक 1968 साली मुंबईच्या उपनगरांतील फूटपाथवर झोपठ्यांबाहेर झोपणाऱ्या लोकांवर पुन्हा हल्ले सुरू झाले रोज रात्री हल्ले करून हल्लेखोर बेपत्ता होत होता. तो कसलेही पुरावे माग सोडत नव्हता. झोपेत असलेल्या लोकांवर अंधारात हल्ले झाल्याने त्यांना हल्लेखोराचा चेहराही दिसू शकलेला नव्हता. त्याता कसं शोधावं हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होतं. हल्ल्याची पद्धत मात्र सर्वत्र सारखी होती. झोपेतील लोकांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटाच्या खाली रॉडने हल्ला केला जायचा रॉडचा फटका बसताच झोपेतील माणूस शक्यतो तिथल्या तिथेच मरायचा.मग कसून तपास सुरू झाला तो आधी प्रश्नांची उत्तरे देत नव्हता. भरपूर नॉन व्हेज खायला दिल्यानंतर त्याने तोंड उघडलं. मग तो एक एक हत्येविषयी सांगू लागला गाने लपवलेला रॉडही पोलिसांना सापडला. तो सिइफ्रिनिया या गानसिक आजाराचा पूर्वी रुग्ण होता पण अटक केली तेव्हा तो मानसिक रुग्ण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, आपण काय करत आहोत, हे त्याला कळत होते तो लहानपणापासून गुन्हे करत होता. त्याच्या विरोधातीत भक्कम पुराव्यामुळे रामन राघवता फाशीची शिक्षा झाली. त्याने सर्व गुन्हे मान्य केले होते. पुढे 1987 साली तिचं जन्मठेपेत रूपांतर करण्यात आलं तो 1988 ते 1987 व नंतर 1995 पर्यंत कारागृहातच होता 27 वर्षांनी मृत्यूने त्याची सुटका केली.
पण हल्लेखोर एकही पुरावा सोडत नसल्याने पोलीस आताड़ी गोंधळले होते यापैकी बहुसंख्य हल्ले जून जुलै 1968 मध्ये झाले होते. एका मृत महिलेवर बलात्काराचा प्रयत्नही त्यानं केला होता मालाडमध्ये मुस्लीम शिक्षकाची आणि यादव कुटुंबातील दोघांची एकाच वेळी हत्या केली. एका शिंप्याला ठार केलं होतं हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेने केलेल्या वर्णनानुसार हल्लेखोराचं चित्र तयार करून सर्व पोलिसांना पाठवण्यात आलं तत्कालीन पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी तपासावर लक्ष ठेवून होते.
ज्याच्याविषयी संशय येई, अशा प्रत्येकाला पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊ लागते. दुसऱ्या पाळीतील नोकरी आटोपून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या काड़ी कामगारांनाही त्यांनी ताब्यात घेतलं काहीना रात्रभर रस्त्यावर उभं केलं आणि त्यांची तिथंच झाडाझडती केली, जे कामगार रात्रभर घरी परतले नाहीत, त्यांच्या घरात तर खूपच काळजी व भीती असायची. घरच्यांना बरे वाईट झालं की काय, इत्ता झाला की काप, असे विचार होक्यात येत वसाहतीतील पुरुष हातात लाठ्या काठ्या घेऊन रात्रभर पहारा देत. अफवांनाही ऊत आता होता.
पोलिसांनी मालाडमधून पकडलं, कुर्य्यातून अटक केली, रात्री बोरिवतीला तो एका माणसाच्या डोक्यावर दगड घालण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला उचलले, अशा असंख्य अफवा सुरु झाल्या, आमच्या शाळेत चर्चा सुरू झाली की तो धावत असताना पोलिसांनी त्याच्या अंगावर कुत्रा सोडला, तर तो आधी मांजर झाला आणि मग उंदीर बनून तो एका बिळात शिरता अटक टाळण्यासाठी एकदा तो झाडावर बसला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस झाडावर चढले आणि त्यांना पाहताच तो पोपट बनून उडून गेला मात्र बऱ्याचदा हल्लेखोर म्हणे गोरेगावच्या जंगलात वपायता जायचा, असं पोलिसांना वाटत होतं.
यावेळी जुलैमध्ये त्याने उपनगरातील एक दोन नव्हे, तर तब्बल 41 जणांना हल्ला करून ठार केलं होतं. मुंबईकरांवरील दहशत वाढत चालली होती आणि गुन्हेगार सापडत नसल्यानं पोलिसांवर टीका होत होती. डोगरी पोलीस ठाण्याचे सबइन्स्पेक्टर अॅलेक्स फियाल्डो 18 ऑगस्ट 1958 रोजी कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभे होते. त्यांच्या खिशात संशयिताचं चित्र होतं. त्याचं स्टॉपवर एक जण दिसला. हातात छत्री असलेला अजिबात पाऊस नसताना हातात छत्री? फियाल्हो यांनी चौकशी केली तर तो म्हणाला की, मी मालाडहून आलीय. आदल्याच दिवशी गालाठगी हत्या झाली होती आणि झोपलेल्याची छत्री गायब झाली होती अॅलेक्स फियाल्डो यांनी त्याला चौकीत आणलं. तपासात त्याच्याकडे एक कधी नसलेला चष्मा व सुईत दोरा घालताना बोटाला ती लागू नये यासाठी शिंप्याकडे असतो तो अंगठा सापडला हत्याही शिंप्याचीच झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.