'आजोबा नेहमी भेदभाव करता...', 500 कोटींची संपत्ती अन् चाकूचे सपासप 70 वार, नातवानेच उद्योजकाला संपवलं !
गेल्या काही दिवसांपासून प्रॉपर्टीच्या वादावून अनेक गुन्हे घडत असल्याचं चित्र समोर येत आहे. अशातच तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, एका 86 वर्षीय उद्योगपतीची त्यांच्या नातवाने त्यांच्या घरात चाकूने वार करून हत्या केली. मालमत्तेच्या वादातून नातवाने उद्योगपतीची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. आजोबा नेहमी भेदभाव करत असल्याचा आरोप करत नातवाने आजोबावर चाकूने 70 वार केले. वृद्ध उद्योजकांच्या निधनानंतर आता आरोपी नातवास अटक केली गेली आहे.
नेमकं काय झालं?
मालमत्तेच्या वादातून व्ही.सी. जनार्दन राव यांचे कुटूंबासोबत वाद होते. 6 फेब्रुवारीच्या रात्री घडली. 28 वर्षांचा नातू कीर्ती तेजा याच्यासोबत जनार्दन राव यांचा वाद होता. पण वाद आणखी पेटल्यानंतर नातवाने टोकाचा निर्णय घेतला. शहराच्या दुसऱ्या भागात राहणारे तेजा आणि त्याची आई गुरुवारी सोमाजीगुडा येथील व्ही.सी. जनार्दन राव यांच्या घरी गेले होते. तेजाची आई कॉफी घेण्यासाठी गेली तेव्हा तेजा आणि राव यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू झाला. त्यावेळी मालमत्तेचे विभाजन करण्यास नाकार दिला होता. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला.आईवर चाकूने वार
आरोपीच्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावरही चाकूने वार केले. यामुळे आरोपीची आई जखमी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं पंजागुट्टा पोलिसांनी सांगितलं. जनार्दन राव यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. उद्योजक राव यांच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले. व्ही.सी. जनार्दन राव हे वेलजन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
अमेरिकेतून हैदराबादला परतला
आरोपी नुकताच अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून हैदराबादला परतला होता. तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. दरम्यान, 'वेलजान ग्रुप' ही कंपनी 1965 मध्ये स्थापन झाली असून, जहाज बांधणी, ऊर्जा, मोबाइल आणि औद्योगिक विभागांसह विविध क्षेत्रांत ही कंपनी काम करते. व्ही.सी. जनार्दन राव हे वेलजन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.