जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
तसंच न्याय मिळाला नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशाराही देशमुख कुटुंबाकडून देण्यात आला होता. मनोज जरांगे आमच्या आंदोलनासोबत ते सहभागी होणार आहेत. आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, अशी माहिती आमच्याकडे आली आहे मात्र त्याची खात्री करत आहोत पण संशय आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही सरकारच्या वतीने कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्याची शिष्टमंडळ भेटायला आले नाही. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भेटायला आले, अशी खंतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता
मनोज जरांगे यांनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केलं जात नाही का? असा सवालही जरांगेंनी केलाय.
कृष्णा आंधळेला अटक करा: मनोज जरांगे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चारशीट मध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपासी यंत्रणाला 100 टक्के मुभा दिलेली नाही. 25 तारखेला उपोषणा ठरला आहे संवेदनशील विषय आहे.. निवेदन असलं नसलं तरी सहकार्य करा. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांची चौकशी करा. कृष्णा आंधळे याला अटक करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.