मोठा निर्णय...पोलिस निरीक्षकांच्या तैनातीत फेरबदल!
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शनिवारी शहरातील पोलिस निरीक्षकांच्या तैनातीत मोठे फेरबदल केले आहेत. जरीपटका ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक संजय सिंह यांची तहसील तर सीताबर्डीचे नवीन ठाणेदार म्हणून म्हणून विठ्ठलसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय सह यांनी लोहमार्गमध्येही महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहीले आहे. त्यांना अनुभव असून विविध राज्यात संपर्क आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांचा अनुभव आणि संपर्क कामी येतील.
तहसील ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्याकडे गुन्हे शाखा युनिट 5 ची कमान देण्यात आली आहे. तर सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) मध्ये पाठविण्यात आले आहे. अंबाझरीचे विनायक गोल्हे यांची ईओडब्ल्यूमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे विवेकानंद राऊत यांच्याकडे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपविली. पोलिस आयुक्तांचे रीडर शरद कदम यांना इंदोरा वाहतूक झोनमध्ये पाठविण्यात आले. कळमन्याचे दुय्यम निरीक्षक सतीश आडे हे आता कपिलनगरचे नवे ठाणेदार होतील, तर पीआय महेश आंधळे यांच्याकडे नवीन कामठी पोलिस ठाण्याची नेतृत्व देण्यात आले.
सक्करदराचे ठाणेदार अनिल ताकसांडे आता गुन्हे शाखा युनिट 3 ची कमान सांभाळतील. त्यांच्या जागी पीआय मुकुंद ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. सक्करदरा वाहतूक झोनचे भरत कऱ्हाडे यांची कोतवालीचे नवे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पीआय अतुल मोहनकर यांना पाठविण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे बबन येडगे हे आता मानकापूरचे नवे ठाणेदार असतील, तर मानकापूरचे पीआय प्रशांत ठवरे यांना पोलिस आयुक्ताचा रीडर नियुक्त करण्यात आले आहे. बजाजनगरचे दुय्यम पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे.
तर सायबर पोलिस ठाण्याचे पीआय अमित डोळस यांच्याकडे राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर पीआय महेश सागडे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांच्याकडे कॉटन मार्केट वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. इमामवाडाचे ठाणेदार रमेश ताले यांना आर्थिक गुन्हे शाखेत पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी युनिट 5 चे पीआय राहुल शिरे यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे अमोल देशमुख यांना गुन्हे शाखा युनिट 1 ची जबाबदारी देण्यात आली आहे, तर पीआय सुहास चौधरी यांना वाहतूक शाखेत पाठविण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.