विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे गेल्याकाही दिवसांपासुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी खरंच भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया
दिली आहे. एका मुलाखातीत बोलताना महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय
परिस्थिती नाही. संवाद करायला. बोलायला काही अडचण नाही. असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे पण त्या व्यतिरिक्त कुठेही आमची भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की, समोर भेटल्यानंतर नमस्कार करणार नाही. आम्ही समोरासमोर भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. आमच्याच संबंध आहेच. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती नाही. संवाद करायला आणि बोलायला काहीच अडचण नाही. पण भेटलो की लगेच माध्यमांत चर्चा होते. असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या मुलाखतीमध्ये पुढे बोलताना देवेंद्र
फडणवीस म्हणाले की, त्यादिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धव ठाकरे यांच्याशी
एका लग्नात भेटले. उद्धव ठाकरे यांना सवय आहे की, भेटल्यावर काहीतरी
मिश्किलपणे बोलणार. त्यानंतर हे कायतरी बोलले. त्यावर लगेच अशा बातम्या
झाल्या की, जसं दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांत
पाटील यांनी त्यांना पायघड्या टाकलेल्या आहेत. असं नाही. ठीक आहे. संबंध
आहे पण अशी परिस्थिती नाही पण आम्ही लगेच त्यांना जवळ घेतोय आणि सत्तेत
घेतोय असं देखील नाही. असं या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो
तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल बैठक होती आणि त्या बैठकीआधी मला एकनाथ शिंदे यांचा फोन आल की, वैनींच्या काही टेस्ट करायचे आहे, त्यामुळे मला बैठीला येण्यास उशीर होईल, त्यामुळे मी उशिरा बैठकीला येण्यापेक्षा बैठकीला नाही आलो तर चालेल का? असं त्यांनी मला विचारलं, मी त्यांना म्हटलं की, चालेल, हरकत नाही. ते अनुपस्थित राहिल्यानंतर लगेच बातम्या चालल्या की एकनाथ शिंदे नाराज आहे. असं या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.तसेच जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो, तुम्ही 90 टक्के बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो.जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांचा चेहरा गंभीर होता आणि आता त्यांचे ते फोटो दाखवून शिंदे हसतच नाही, ते नाराज आहे. असं दाखवण्यात येत आहे. आता त्यांनी काय करावे? हा प्रश्न आहे. असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.