Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री भटकत होती महिला, पोलिसांनी पाहिलं अन् गाडीत बसवलं, तेवढ्यात.

रात्री भटकत होती महिला, पोलिसांनी पाहिलं अन् गाडीत बसवलं, तेवढ्यात.

 
रात्रीच्या वेळेस बाहेर भटकणाऱ्या एका मानसिक आजारी (अर्धवेड्या) महिलेला घरी सोडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला उत्तर प्रदेशातील औरैया येथील सहयाल पोलीस स्टेशन परिसरात अपघात झाला. ही महिला रात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरत होती, मात्र पोलिसांनी ते पाहिलं आणि तिच्याशी बोलले तेव्हा त्यांना तिच्या अवस्थेबद्दल समजलं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि ते तिला गाडीत बसवून घरी सोडायला जात होते. मात्र तेवढ्यात त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला आणि होत्याचं नव्हतं झालं.

 

अचानक कुत्रा समोर आल्याने गाडी चालकाचा ताबा सुटला आणि त्याला वाचवण्याच्या नादात पोलिसांची जीप एका मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. हे प्रकरण सहायल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहायाल पोलीस ठाण्याचे प्रमुख रात्री उशिरा आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह पाहणी करत होते. तेवढ्यात त्यांना भररस्त्यात एक स्त्री फिरताना दिसली. ते पाहून पोलिसांनी जीप थांबवली आणि त्या महिलेची चौकशी केली. ती महिला मानसिक आजारी असल्याचे त्यांना समजलं. त्या महिलेचं नाव पूजा होतं आणि ती बिधूना कोतवालीच्या चंद्रपुर येथील रहिवासी असल्याचे त्यांना कळलं.
कुत्रा मध्ये आल्याने अपघात यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी त्या महिलेला आपल्या सरकारी गाडीत बसवलं. त्यानंतर महिला कॉन्स्टेबल आणि अन्य चार पोलीस कर्मचाऱ्यांसह महिलेला तिच्या घरी सोडण्यासाठी निघाले. तेवढ्यात त्या वाटेवर एक कुत्रा अचानक गाडीसमोर आला. त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचा तोल सुटला आणि ती गाडी खड्डयात पलटी झाली. यामुळे अनेक लोकं कारमध्ये अडकले.

महिलेला घरी पाठवलं
या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी सर्वांना बाहेर काढले. अपघाताबद्दल कळता इतर पोलीस दलही घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले. जखमींना पाहिल्यानंतर त्यांनी त्या महिलेला तिच्या घरी परत पाठवलं. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.