अंधाऱ्या रात्री दोघच सायकलवरून शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळ्याला निघाले
दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यात गडकिल्ल्यांना भेटी देऊन महाराजांना अभिवादन करतात. शहरांपासून ते खेड्यांपर्यंत शिवजयंती साजरी केली जाते. १९ फेब्रुवारीच्या पूर्वसंधेला गडकिल्ल्यांवरुन ज्योत आणली जाते, सध्या दोन छोट्या शिवभक्तांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं दिसत आहेत. त्यांचं वय साधारण १० ते १२ वर्षे आहे. एका सायकवरुन त्या दोघांनी पन्हाळगडाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंधेला पन्हाळा गडावर परिसरातून आलेल्या तरुणांची मोठी गर्दी असते. गडावरुन ज्योत घेऊन जात शिवजयंती साजरी केली जाते, रात्री १२ वाजल्यापासून ज्योतघेऊन जाण्यास सुरुवात होते. तरुणांची मोठी गर्दी असते. या गर्दीत हे दोन लहान मुलेही ज्योत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या गावातून रात्रीच सायकलवरुन आल्याचे दिसत आहे.
या दोन लहान मुलांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम वापरकर्ते शहाजी भोसले यांनी शेअर केला आहे. भोसले यांनी स्वतः हा व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये ते त्या मुलांची चौकशी करत असल्याचे दिसत आहे. या मुलांचे गाव पन्हाळ गडापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर सांगली जिल्ह्यातील कुरळप हे गाव असल्याचे सांगत आहेत. एवढ्या लहान वयात रात्रीच्या अंधारात दोघांनीच प्रवास केला आहे, आतापासूनच या लहान मुलांमधील शिवभक्ती पाहून अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.