Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डास मारा, पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी या देशाची अनोखी मोहीम

डास मारा, पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी या देशाची अनोखी मोहीम

 
मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार होतात. तसेच साथीचे रोगाचा फैलाव जोमाने होतो. उष्ण आणि समशीतोषण कटीबंधात मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. मच्छरांपासून होणारे रोग रोखण्यासाठी डासनिर्मूलनासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. तसेच जनजागृतीही करण्यात येते. मात्र, एका आशियाई देशात डास मारा, पैसे कमवा, अशी अनोखी मोहीम डास निर्मूलनासाठी राबवली जात आहे.

 
फिलीपिन्स देशात मनिला येथेअशी अनोखी मोहीम राबवली जात आहे. डासांपासून होणारे रोग आणि मच्छरांची पैदास कमी करण्यासाठी जनतेच्या प्रत्यक्ष सहभागीसाठी अशा मोहीम राबवण्यात येत आहे. येथे ठराविक परिसरातील नागरिक रांगेत उभए राहतात आणि मारलेल्या मचछरांचा पुराव देत पैसे कमवत आहेत. जनतेची साथीचे राग आणि मच्छरांपासून होणाऱ्या रोगांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. त्याला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत असून मच्छरांची संख्या कमी झाली असून रोगांचा प्रादुर्भावही कमी होत असल्याचे सांगण्यात आले. फिलीपिन्सचे आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञ या मोहिमेच्या यशाबाबत साशंक होते. मात्र, योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काहीजण मुद्दाम डासांची पैदास करतील आणि त्यांना मारून पैसे कमावतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, ते वाटते तवेढे सोपे नाही. मच्छरांची पैदास करून त्यांना पकडणे खूप कठीण आहे. तसेच डासांपासून होणाऱ्या रोगांना दूर करण्यासाठी जनता यात सहभागी होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने 2023 मध्ये पश्चिम पॅसिफिक प्रदेशात फिलीपिन्सला डेंग्यूने सर्वाधिक प्रभावित देश म्हणून स्थान दिले होते, तेव्हा तेथे 167,355 रुग्ण आढळले होते आणि त्यात 575 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली असून त्याचा चांगला परिमाम दिसत आहे. अनेकांना याचा आर्थिक फायदाही झाला असून ते या पैशांचा योग्य वापर करत आहेत. तर काहीजणांनी मच्छरांपासून होणारे आझार अनुभवले असल्याने ते स्वतःहून या मोहिमेत सहभाग घेत आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.