Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अडीच मिनिटांत पंधरा लाख रूपये लुटले! बँकेत दिवसाढवळ्या चोरी, कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार

अडीच मिनिटांत पंधरा लाख रूपये लुटले! बँकेत दिवसाढवळ्या चोरी, कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
 

बँकेत लूटमार होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. त्यातून चिंतेचे वातावरण आहे त्यातून आता अशीच एक घक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी एका बँकेत चक्क दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. यावेळी अडीच मिनिटांत चोरट्यांनी 15 लाख रूपये लुटले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना नुकतीच केरळ येथे घडली. या प्रकाराने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. इतके पैसे लुटत नेताना कुणीच काहीच करू शकले नाही. परंतु पोलिस याचा तपास घेत आहेत.

 
मिळालेल्या माहितीनुसार, येथे महामार्गावर असलेल्या एका बँकेत एक व्यक्ती आला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून बँकेतील सर्व कर्मचार्‍यांना वॉशरूममध्ये बंद केले आणि तो चक्क स्कूटरवरून 15 लाख रूपयांची रोकड घेऊन फरार झाला. हे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये तो माणूस बँकेत कामाला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना चाकूने धमकावत आणि त्यांना वॉशरूममध्ये बंद करताना दिसतो. त्यानंतर तो खुर्चीचा वापर करून कॅश काउंटरचे काचेचे चेंबरला फोडतो आणि पैसे घेऊन पळून जातो. पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेला फक्त अडीच मिनिटे इतकाच वेळ लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता त्रिस्सूर जिल्ह्यातील पोट्टा येथील फेडरल बँकेच्या शाखेबाहेर बॅग घातलेला एक माणूस बँकेच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसून आला आहे. यावेळी बँकेतील बरेचसे कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेले होते. दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी मोहिम उघडली असून अद्याप हा आरोपी सापडलेला नाही. पोलिसांना संशय आहे की, दरोडा टाकणारा व्यक्तीला बँकेच्या परिसराची माहिती होती.

त्रिस्सूर ग्रामीण एसपी बी कृष्ण कुमार यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती देताना माध्यमांना सांगितले की, ''आरोपी हिंदीमध्ये बोलत होता. कॅश काउंटरवर 47 लाख रूपयांचे बंडल होत्या. चोराने नोटांचे फक्त तीन बंडल जे की 15 लाख रुपये होते ते पळवले. तो बँकेच्या शाखेत अशा प्रकारे वागला जसे की त्याला या ऑफिसची चांगली माहिती आहे.'' हा व्यक्ती नक्की कोण? तो कुठून आला होता? सोबतच त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यावेळी त्याने चेहरा काळ्या मास्कने झाकला होता त्यामुळे त्याचा चेहरा लक्षात घेता आलेला नाही. परंतु ही चोरी त्याने अत्यंत चालाखीने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.