दिल्लीतील विजयानंतर सांगलीत भाजपतर्फे विजयोत्सव पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा हा करिष्मा :सुधीरदादा गाडगीळ
सांगली, दि.८ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असे यश मिळवले. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला. या विजयानंतर सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला.फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा, निर्णय यांचा आणि विकास कामांचा हा विजय आहे.
दिल्लीतील निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाच्या आसेतू हिमाचल विजयाची आणि संपूर्ण देशाची विकासाकडे सुरू असलेली घोडदौड अधिकच अधोरेखित झाली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे कल लक्षात येऊ लागतात कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयासमोर गर्दी जमली होती.सर्वजण प्रचंड उत्साहात होते. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान सांगली शहरासह जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, सिद्धार्थ गाडगीळ, भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश तात्या बिर्जे, माजी महापौर संगीता ताई खोत, माजी नगरसेवक विठ्ठलतात्या खोत,भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, सरचिटणीस केदार खाडिलकर , सुभाष गडदे, अभिजीत मिराजदार, श्रीकांत तात्या शिंदे, प्रशांत गौंडाजे,, अमित देसाई, रणजीत सावंत, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, डॉ. भालचंद्र साठे, मकरंद महामुलकर सुनील जाधव, सुजित काटे, गणपती साळुंखे, गौस पठाण, सुजित राऊत,निलेश निकम, कुणाल संकपाळ, प्रदेश सचिव प्रदीप कांबळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.