८८ वर्षांनी शुक्रवारी नमाजची सुट्टी रद्द !
गुवाहाटी: अस्साम विधानसभेत अधिवेशनादरम्यान आमदारांना दिली जाणारी २ तासांची शुक्रवारीची नमाजची सुट्टी तब्बल ८८ वर्षांनी पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे. राज्यातील भाजप सरकारच्या इच्छेनुसार नमाजची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय गेल्या ऑगस्टमध्येच घेण्यात आला होता.
मात्र चालू अधिवेशनापासून तो लागू झाला आहे. याला मुस्लिम आमदारांनी विरोध दर्शविला आहे. 'विधानसभेत सुमारे ३० मुस्लिम आमदार असून, त्यांनी या कृतीला विरोध केला होता. तरीही भाजपकडे संख्याबळ असल्याने हा निर्णय लादण्यात आला' असा आरोप त्यांनी केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना सभापती बिस्वजीत दैमारी म्हणाले, 'संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. इतर दिवसांप्रमाणेच शुक्रवारीही कोणतीही नमाजची सुट्टी न देता सदन चालेल'. या कृतीचे स्वागत करताना मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा म्हणाले, '१९३७ मध्ये मुस्लिम लीगचे नेते सय्यद सादुल्ला यांनी या पद्धतीची सुरुवात केली होती'.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.