भारत श्रीमंत, आम्ही का देऊ १८२ कोटी? ट्रम्प म्हणाले, "मी मोदींना सांगितले की आम्ही ..."
न्यूयॉर्क/फ्लोरिडा : भारताकडे भरपूर पैसा आहे. आपण त्यांना १८२ कोटी रुपये का देत आहोत, अशी विचारणा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी २.१ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या वाटपामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच वेळी ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ शुल्कातून कोणतीही सूट दिली जाणार नाही हे मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
टॅरिफच्या मुद्द्यावर माझ्याशी कोणीही वाद घालू शकत नाही. मी पंतप्रधान मोदींना अमेरिकेत असतानाच सांगितले होते की, आम्ही टॅरिफ शुल्क लावणार आहोत. तुम्ही जेवढे शुल्क आकाराल, तेवढेच शुल्क मी तुमच्यावर आकारेन. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नाही, नाही, मला ते आवडणार नाही असे म्हटले. त्यावर तुम्ही जो काही कर लावाल, तोच मी लावेन. मी प्रत्येक देशासोबत असेच करत आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर भारताने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प म्हणाले, 'भारताबद्दल खूप आदर आहे. मला भारताच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. भारतात मतदानाची टक्केवारी खूप आहे. मात्र, भारतात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण २.१ कोटी अमेरिकन डॉलरची मदत का देत आहोत? त्याच्याकडे खूप पैसे येतात. आपल्यासंदर्भात, भारत हा जगातील सर्वांत जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यांचे शुल्क खूप जास्त असल्याने आपण तिथे पोहोचू शकत नाही. मी त्यांना दोष देत नाही; परंतु व्यवसाय करण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. भारतात विक्री करणे खूप कठीण आहे. कारण त्यांच्याकडे व्यापारासाठी खूप अडथळे आहेत.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.