Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-माजी उपमहापौराची ठेकेदारपुत्रास मारहाण

सांगली :-माजी उपमहापौराची ठेकेदारपुत्रास मारहाण


सांगली, ता. १३ : महापालिकेतील 'निविदा मॅनेज'च्या वादातून माजी उपमहापौराकडून एका बड्या ठेकेदाराच्या मुलाला मारहाण व धक्काबुक्की झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ही घटना घडली. पोलिस दप्तरी नोंद नसली, तरी पालिका वर्तुळात मात्र जोरदार चर्चा होती. यानिमित्त पालिकेतील 'निविदा वॉर' पुन्हा एकदा उफाळले आहे.

 

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनातर्फे सध्या विविध कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ठेकेदारांमध्ये नेहमीच्या सामंजस्याने वाटप होत असते. अनेक नगरसेवक हे ठेक्यातील 'स्लिपिंग पार्टनर' असतात. त्यांनी आपले राजकीय 'वजन' वापरून कामे मिळवायची आणि ठेकेदारांनी त्यातला 'टक्का' द्यायचा असा हा राजमान्य रूढ व्यवहार असतो. शिवाय त्या-त्या भागातील नगरसेवकांचा 'टक्का' असतो. अलीकडे यातील मक्तेदारीला सत्ताधारी गटातील काहींकडून धक्के बसत आहेत. वाटपात हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा मॅनेज' होते. 

सत्ताधारी भाजपमधील वरिष्ठ वर्तुळातील पदाधिकाऱ्यांमध्ये पालिकेच्या आवारात मारहाणीचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यातली ही पुढची कडी आहे. काही ठेकेदारांनी तर १० टक्के लाच द्यावी लागत असल्याची तक्रार दाखल केली आहे. खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेत खालच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला असला, तरी वरच्या पातळीवर तो बोकाळला आहे, अशी कबुली दिली आहे. या प्रक्रियेमध्ये काही माजी नगरसेवकांचा थेट संबंध असल्याची चर्चा आहे. आजच्या धक्काबुक्की प्रकरणामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.