लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या
लाडक्या बहिणी आठवा हफ्ता येण्याची वाट बघत आहे. त्यापूर्वी फडणवीस सरकारने या योजनेत नवी सुधारणा केली आहे. लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थीनाच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने नवी सुधारणा केली आहे. लोक या योजनेला लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचे षडयंत्र म्हणत आहे.
या योजनेत पूर्वीच पाच लाख महिलांची पात्रता काढून टाकण्यात आली असून अद्याप 2 कोटींहून अधिक बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे. राज्य सरकार कडून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्सच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या पात्रतेची तपासणी आधीच सुरु केली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात आठव्या हफ्ताचे पैसे पुढील 8 दिवसांत बँकेच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.