जिल्हा शल्य चिकिस्क कार्यालया मार्फत अधिकारी व कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा अभियांतर्गत मोफत हेल्मेट वाटप
सांगली : येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील एका डॉक्टरांचा काही दिवसांपूर्वी दुचाकी अपघातात बळी गेला. त्यामुळे कार्यालयातील सर्वांनी हळहळ व्यक्त केली. त्यावर न थांबता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिह कदम, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ. प्रमोद चौधरी यांनी पुढाकार घेऊन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना हेल्मेटचे वाटप केले. सुमारे १५० जणांना हेल्मेट देण्यात आली. त्यासाठी आरटीओ, भगीरथ सुझुकी यांनी मदत केली.
गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ते सुसज्ज झाल्याने अपघातही वाढले आहेत. अनेक लोकांचा बळी अपघातात जात आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जागृती करण्याची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जागृती करण्यात येत आहे. डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकारी सतर्क झाले. सिव्हिल हॉस्पिटल, सांगली वैद्यकीय शिक्षण व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना मंगळवारी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. हेल्मेट घेण्यासाठी गर्दी झाली होती. हेल्मेटशिवाय प्रवास न करण्याचा निर्धार सर्वांनी केला.
भगीरथ सुझुकी संस्थेचे मालक दीपककुमार पाटील यांनी १५० हेल्मेट उपलब्ध करून दिले. सुमारे १ हजार हेल्मेट वाटपाचा त्यांचा संकल्प आहे. २६ जानेवारीरोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीमध्ये संकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्याहस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सर्व नियम व अटी पाळण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, मोटर वाहन निरीक्षक सागर भोसले, सहायक मोटर वाहन निरीक्षक सतीश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.