शेतकऱ्यांनो तुम्हीही शेतात घर बांधताय? नाहीतर घरातून निघाव लागेल बाहेर, पाहा काय सांगतो कायदा
गावाकडील शांततेत शेतजमिनीवर घर बांधण्याची कल्पना अनेकांना आकर्षित करते. हिरवीगार शेती, ताजं हवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं स्वप्न अनेकांच्या मनात असतं. पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यापूर्वी काही कायदेशीर अटी आणि प्रक्रिया लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण शेतजमिनीवर थेट घर बांधणं कायदेशीरपणे अडचणीचे ठरू शकते. महाराष्ट्र राज्याच्या सद्य कायद्यानुसार, शेतजमिनीवर घर बांधणं सीधेपणे शक्य नाही. शेतजमीन तुमच्या नावावर असली तरी, त्या जमिनीवर घर उभारण्यासाठी आधी संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी जमीन ‘बिगरशेती’ (NA) श्रेणीत रूपांतरित करावं लागतं.
शेतजमिनीसाठी घर बांधण्यासाठी आवश्यक परवानग्या कशा मिळवायच्या? यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा संबंधित प्राधिकरणाकडून ‘नं.ओ.सी’ (NOC) घ्यावी लागते. तसेच, शेतजमिनीसाठी त्याच्या बिगरशेती (NA) प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जातो. अर्ज मंजूर होण्यासाठी, तहसील कार्यालयात जमीनाची तपासणी केली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून NA प्रमाणपत्र जारी केलं जातं. यामध्ये सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता करणं अत्यावश्यक आहे.
या प्रक्रियेत मुख्यत: काही कागदपत्रांची आवश्यकता आहे, जसे की – जमीन मालकाचे ओळखपत्र, सातबारा उतारा, पीक आणि जमीन वापराची नोंद, महसूल पावत्या, सर्वेक्षण नकाशा, व इतर कायदेशीर दाखले. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये नवीन शासन निर्णय जारी केला आहे, ज्यामध्ये बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम (BPMS) लागू केली आहे. यानुसार, बिगर कृषी वापर प्रमाणपत्र आणि विकास परवानगी मिळवण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे, शेतजमिनीचा वापर घर बांधण्यासाठी करणार असाल, तर त्या जमिनीचा संपूर्ण ताबा असणे आवश्यक आहे आणि ती जमीन सार्वजनिक प्रकल्पासाठी आरक्षित नसावी. तसेच, औद्योगिक किंवा टाऊनशिप प्रकल्पांसाठी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अखेर, शेतात घर बांधण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास, तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या घराचा आनंद घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.