Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीवाडीच्या कदमवाडीतील घटना आईला त्रास देत असल्याने आईच्या प्रियकराचा मुलाने केला निघृण खून

सांगलीवाडीच्या कदमवाडीतील घटना आईला त्रास देत असल्याने आईच्या प्रियकराचा मुलाने केला निघृण खून 


सांगली :  आईला बेदम मारहाण करणाऱ्या तिच्या प्रियकराचा मुलाने साथीदारांच्या मदतीने निघृण खून केला. गुरुवारी दुपारी सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

दत्ता शरणाप्पा सुतार (वय 30) असे खून झालेल्याचे नाव आहे. दत्ता याचे इंदिरानगर येथील एका महिलेसोबत गेल्या आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेसोबत कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौक परिसरात रहात होता. त्यांच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही रहात होता.

मृत सुतार बांधकाम तसेच सुतार काम करत होता. त्याच्यासोबत त्या महिलेचा मुलगाही काम करत होता. गुरुवारी सकाळी दत्ता आणि त्या महिलेमध्ये वाद झाला. त्यानंतर दत्ता याने महिलेला बेदम मारहाण केली होती. याचा राग त्या मुलाच्या मनात होता. आज दुपारी सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता दुचाकीवरून (एमएच 09 BQ 4985) दत्ता निघाला असताना त्या मुलासाह त्याच्या साथीदारांनी दत्तावर कोयता तसेच धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दत्ताच्या डोक्याचा चेंदामेंदा केला, तो रक्ताच्या थारोळ्ळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून निघून गेले. घटना घडल्यानंतर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. यातील हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करू असे निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.