Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिमुकल्याच्या हातात दिलं स्टेअरिंग, स्वत: बनवला व्हिडीओ, महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची स्टंटबाजी

चिमुकल्याच्या हातात दिलं स्टेअरिंग, स्वत: बनवला व्हिडीओ, महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची स्टंटबाजी

पालघरच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची स्टंटबाजी समोर आली आहे. या अधिकाऱ्याने चिमुकल्या मुलाच्या हातात कारची स्टेअरिंग दिली आहे. या लहानग्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पालघरमधील महसूल विभागातील एका अधिकाऱ्याचा प्रताप उघडकीस आला आहे. बोईसर जवळील मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी त्यांच्या लहान मुलाच्या हातात कारचे स्टेअरिंग दिले. अधिकारी विजय गुंडकर हे ड्रायव्हरच्या सीटवर बसले आहेत. गुंडकर यांच्या मांडीवर त्यांचा लहान मुलगा बसला आहे. तो चिमुकला स्टेअरिंग हातात घेऊन कार चालवत आहे, असे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या अधिकाऱ्याने स्वत:च हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले आहे. राज्यात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होत असताना एक सरकारी अधिकाऱ्याने केलेल्या स्टंटबाजीच्या व्हिडीची चर्चा होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.