Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आमच्या विश्वगुरूंचा अपमान'; पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्स दौऱ्यात टॅक्सीने करावा लागला प्रवास? चर्चेतील फोटोत सत्य लपवण्याचा प्रयत्न

'आमच्या विश्वगुरूंचा अपमान'; पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्स दौऱ्यात टॅक्सीने करावा लागला प्रवास? चर्चेतील फोटोत सत्य लपवण्याचा प्रयत्न
 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी पॅरिसमधील दूतावासानंतर देशातील दुसऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले.

या भेटीदरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कारमधून उतरताना दिसत आहेत. ते पाहून असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या अलीकडच्या फ्रान्स दौऱ्यात टॅक्सीने जावे लागले. तपासादरम्यान आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

काय होत आहे व्हायरल ?

एक्स युजर्स @wankar_sun93339 सुनील व्हीबीने एक फोटो ‘अरे, फ्रान्सच्या लोकांनो, आमच्या विश्वगुरूंचा इतका अपमान करू नका. तुम्ही त्यांना टॅक्सीतून नाही न्यायला पाहिजे होत’ ; या कॅप्शनसह शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

मग आम्ही फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला आढळले की, २०२१ मध्येही हाच फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता.

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान, आम्हाला ANI च्या एक्स (ट्विटर) हँडलवर अपलोड केलेली व्हायरल इमेज आढळली.

वाहनाची नंबर प्लेट व्हायरल झालेल्या फोटोसारखीच होती.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पोप फ्रान्सिस यांच्याबरोबर खासगी भेटीसाठी व्हॅटिकन सिटीमधील सॅन दामासो प्रांगणात (San Damaso courtyard in The Vatican) भेट दिली होती.

https://www.moneycontrol.com/news/photos/world/in-pics-pm-narendra-modi-arrives-in-vatican-city-to-meet-pope-francis-7654801-10.html

आम्हाला ANI च्या यूट्यूब चॅनेलवर यासंबंधीचा एक व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये वाहनाची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत होती. पण, हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

निष्कर्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटीमध्ये ज्या कारमधून बाहेर पडले होते, त्या कारचा एक जुना, एडिट केलेला फोटो अलीकडच्या फ्रान्स दौऱ्यात ते टॅक्सीतून बाहेर पडत असल्याचा दावा करीत शेअर केला जात आहे. पण, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे आणि हा व्हायरल दावासुद्धा खोटा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.