Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोटांवरून महात्मा गांधीजींचा फोटो काढला जाणार? RBI ने काय सांगितले बघाच

नोटांवरून महात्मा गांधीजींचा फोटो काढला जाणार? RBI ने काय सांगितले बघाच
 

आपण व्यवहारात वापरत असलेल्या भारतीय चलनी नोटांमध्ये काही बदल होणार असल्याच्या चर्चा होतायत. या चर्चांमध्ये चलनी नोटांमधून महात्मा गांधी यांचा फोटो गायब होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्या आहेत. पण यामागचे नेमकं सत्य काय ? यावर RBI अन गव्हर्नर काय म्हणाले , हे आज आपण या बातमीत पाहणार आहोत.

महात्मा गांधीजींचा फोटो चलनातून हटवला जाणार? -
काही ट्विटर युजर्सने आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्राचा फोटो शेअर करत महात्मा गांधीजींचा फोटो चलनातून हटवला जाणार असल्याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. पण हे सत्य तपासण्यासाठी काही संस्थांनी यावर लगेच संशोधन केले , पण पडताळणीदरम्यान भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) अधिकृत वेबसाइटवर असा कोणताही निर्णय किंवा घोषणा झालेली नाही, तसेच गुगलवर देखील यासंबंधी कोणतीही विश्वसनीय माहिती मिळाली नाही.
RBI काय म्हणाले -

RBI ने स्पष्ट केले आहे कि , सध्याच्या नोटांवर महात्मा गांधींच्या चित्रामध्ये कोणताही बदल करण्याचा त्यांचा काहीही विचार नाही. तसेच, आरबीआयच्या वेबसाइटवर देखील अशा दाव्याला समर्थन देणारी कोणतीही माहिती नोंदवलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे.

प्रसारित होणारी माहिती खोटी -
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणारी माहिती खोटी आहे , हे सिद्ध झाले आहे. या फसव्या आणि खोट्या अफवांमुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांनी अधिक जागरूक राहून आणि विश्वासार्ह स्रोतांचा संदर्भ घेऊनच विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.