मुंबई : राज्यातील पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाने दिलासा दिला आहे. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. ही पदोन्नती गेल्या आठ वर्षांपासून रखडली होती. आता त्यासंबंधित आदेश राज्याचे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच राज्यात लवकरच 80
अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्यात येणार आहेत. तसा शासन निर्णय जारी
करण्यात आला आहे.
गेल्या आठ वर्षांपासून 125 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. त्यावर आता महसूल विभागाने निर्यण घेतला आहे. या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली होती.
राज्यसेवेतील कोणत्या अधिकाऱ्यांना IAS पदी बढती?
1. संजय ज्ञानदेव पवार2. नंदकुमार चैतराम भेडसे3. सुनील बजाजीराव महिंद्रकर4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर5. निलेश गोरख सागर6. लक्ष्मण भिका राऊत7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार8. माधवी समीर सरदेशमुख9. बाळासाहेब जालिंदर बेलदार10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार11. आण्णासाहेब दादू चव्हाण12. गोपीचंद्र मुरलीधर कदम13. बापू गोपीनाथराव पवार14. महेश विश्वास आव्हाड15. वैदही मनोज रानडे16. विवेक बन्सी गायकवाड17. नंदिनी मिलिंद आवाडे18. वर्षा मुकुंद लड्डा19. मंगेश हिरामन जोशी20. अनिता निखील मेश्राम21. गितांजली श्रीराम बाविस्कर22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे23. अर्जुन किसनराव चिखले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.