भारतातून लंडनला शिकायला जात होते, एअरपोर्टवरच 'फेल' झाले, 7 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक अटकेत, प्रकरण काय?
मुंबई : परदेशात जाऊन शिकायचं असं स्वप्न कित्येकांचं असतं. असेच परदेशात शिकायला जाणारे भारतातील 7 विद्यार्थी. लंडनला जाण्यासाठी ते मुंबई एअरपोर्टवर गेले. तिथं चौकशीत ते फेल झाले आणि त्यांच्या प्राध्यापकांना अटक करण्यात आली. परदेशात शिकण्याचं या विद्यार्थ्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. सोमवारी पहाटे 2 तरुण मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर आले. त्याने त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा दाखवला. त्याच्याकडे यूकेचा व्हिजिट व्हिसा होता. त्याने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की तो हरयाणातील एका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो त्याच्या प्राध्यापकांसोबत स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रामसाठी लंडनला जात आहे.
त्या अधिकाऱ्याने त्याला विचारलं की तो हरयाणातील विद्यापीठात कोणता अभ्यासक्रम घेत आहे आणि लंडनमधील कोणत्या विद्यापीठात जाणार आहे. दोन्ही तरुणांना याचे योग्य उत्तर देता आले नाही. त्या अधिकाऱ्याला संशय आला आणि त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवलं. त्यांना कळलं की त्याच प्राध्यापकांसोबत आणखी 5 तरुण लंडनला जात आहेत. पकडलेले विद्यार्थी पंजाब आणि हरियाणाचे असल्याचं प्राध्यापकाने सांगितलं. तो त्यांना यूकेला घेऊन जात होता. हे सर्वजण स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रामसाठी जात होते असं सांगण्यात येत आहे. परंतु व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती देण्यात आल्याचा संशय आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "प्राध्यापक ज्याप्रमाणे दावा करत आहेत त्याप्रमाणे तो हरियाणा विद्यापीठाशी संबंधित आहे की नाही याची आम्हाला अद्याप पुष्टी झालेली नाही." त्याने त्याचे ओळखपत्र दाखवलं आहे, परंतु त्याची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही. हे ओळखपत्र खरं आहे का, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. जेव्हा प्राध्यापकाची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी दावा केला की ते त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून काम करत होते. ते दोघंही हरयाणा विद्यापीठात व्यावसायिक प्रमुख होते. यापूर्वी, तो दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बिट्टू नावाच्या एजंट आणि यूकेमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या सात तरुणांना भेटला होता.
बिट्टूने प्रत्येक तरुणाकडून 20 लाख रुपये घेतले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की बिट्टूने यूकेमधील विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाबद्दल खोटी माहिती देऊन त्यांच्यासाठी व्हिसा मिळवला होता. प्राध्यापक त्या सात तरुणांना दिल्लीहून मुंबईत घेऊन आले आणि त्यांच्यासोबत जेद्दाह मार्गे लंडनला जाणार होते. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन तरुणांच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या मते, गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की हे मानवी तस्करीचं प्रकरण असू शकतं. पोलिसांनी सुरुवातीला सर्व सातही तरुणांना ताब्यात घेतलं, परंतु नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सोडून देण्यात आलं. त्यापैकी तिघं अल्पवयीन आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.