मुलीच्या वयाच्या ११ वर्षीय बालिकेवर वकिलाकडून अत्याचार; पोक्सोखाली अटक
भंडारा : मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या शेजारच्या ११ वर्षांच्या बालिकेशी खोटे बोलून आत बोलावले आणि लैंगिक अत्याचार केला. बालिकेने घरी जाऊन आपल्या आईला आपबीती सांगितल्यावर सोमवारी रात्री ११:१६ वाजता तक्रारीनंतर पोक्सोसह अनेक कलमांखाली अटक करण्यात आली. विजय रेहपाडे (४८) असे या नराधम आणि विकृत वकिलाचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय तक्रारदार महिला तिच्या १३ वर्षाच्या मुलासह आणि ११ वर्षाच्या मुलीसह भंडारा येथे राहते.
त्याची मुलगी ३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आली. संध्याकाळी ७वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. यावेळी मैत्रिणीचे वडील अॅड. विजय रेहपाडे हा घरीच होता. तुझी मैत्रीण आत बेडरूममध्ये खेळत आहे, असे खोटे सांगून त्याने तिला बेडरूममध्ये पाठविले. त्यानंतर पाठोपाठ जाऊन बेडरूममधील लाइट बंद केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेने कशीबशी त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेत संध्याकाळी ७:३० च्या सुमारास रडत स्वतःचे घर गाठले. आईने रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपबिती सांगितली.मुलीने सांगितलेला प्रकार ऐकताच आईच्या पायाखालची वाळूच घसरली. स्वतःला सावरत आणि प्रसंगावधान राखत आईने मुलीसह भंडारा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री पोलिसांनी वकिलाच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ६५ (२) (बलात्काराची शिक्षा), ७५ (लैंगिक छळ), पोक्सोच्या कलम ४, ६, ८, १२ आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी बार असोसिएशनचा उपाध्यक्ष
आरोपी वकील विजय रेहपाडे हा भंडारा जिल्हा बार असोसिएशनचा उपाध्यक्षही आहे. एवढेच नाही तर, भंडारा जिल्हा परिषदेचा अधिकृत वकीलही आहे. मागील १५ वर्षांपासून तो जिल्ह्यात आणि उच्च न्यायालयात वकिली करत असून अलीकडेच त्याची नोटरी म्हणून नियुक्तीही झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.