भारताचा शेजारी, जगातील असा ऐकमेव देश जिथे मंदिरच नाही; पुजापाठ, प्रार्थना केली तर होते भयानक शिक्षा
तुम्ही जगातील कोणत्याही देशामध्ये हिंदू धर्माचे मंदिर बनवू शकता. मुस्लिम देशांमध्ये देखील हिंदू मंदिर उभारण्यास बंदी नाहीये, तुम्ही जगाच्या पाठीवर जाऊन कुठेही पूजा आणि इतर हिंदू धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. पाकिस्तानची भूमिका कायमच भारतविरोधी राहिली आहे, मात्र पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये देखील हिंदू धर्माच्या मंदिरांना तसेच धार्मिक कार्यक्रमांना बंदी नाहीये. पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत, जिथे हिंदू धर्मातील सर्व कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र भारताचा शेजारी असा एक देश आहे, त्या देशात तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मंदिर नाही बनवू शकत.
तसेच तिथे पूजा पाठ आणि इतर गोष्टींवर देखील बंदी आहे. भारतामधून या देशात नोकरीसाठी गेलेल्या लोकांना सार्वजनिक स्थळी पूजापाठ करता येत नाही. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्याचा धक्का बसेल की भारताशेजारी असलेल्या या देशात एकही हिंदू मंदिर का नाहीये? एक काळ असा होता की या देशात मोठ्या संख्येनं हिंदू आणि बौद्ध धर्माच्या लोकांचे वास्तव्य होते. हा देश पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भारत या देशाची लाइफलाईन आहे, या देशाला पाण्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तू भारतातून पाठवल्या जातात. आता आधी या देशाचं नाव माहीत करून घेऊयात आणि त्यानंतर जाणून घेऊयात इथे मंदिर का नाहीये?
या देशाचं नाव आहे मालदीव, मालदीवच्या संविधानानुसार इथे प्रत्येक नागरिकांनं मुस्लिम असणं अनिवार्य आहे. मालदीवमध्ये मुस्लिम धर्म सोडून इतर धर्माची प्रतिकं, पूजा आणि प्रार्थनास्थळ यांना बंदी आहे. जर आढळून आल्यास कडक शिक्षा होता. त्यामुळे या देशात एकही हिंदू मंदिर नाही. तसेच भारतातून तिथे नोकरीसाठी गेलेल्या हिंदू लोकांना देखील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करता येत नाही.
मालदिव हा छोटासा देश आहे, ज्याची लोकसंख्या केवळ 5.5 लाख इतकीच आहे. या देशात भारत आणि श्रीलंकेतून हजारो लोक वास्तव्याला गेले आहेत. जे तिथे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करतात. या देशाला अनेक गोष्टी भारतामधूनच पुरवल्या जातात. क्षेत्रफळाच्या बाबतील बोलायंच झाल्यास या देशापेक्षा दिल्ली पाच पटीनं मोठी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.