Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत चार उन्हाळी विशेष एक्स्प्रेसना थांबा, प्रवाशांना दिलासा

सांगलीत चार उन्हाळी विशेष एक्स्प्रेसना थांबा, प्रवाशांना दिलासा
 

सांगली : जिल्हा नागरिक जागृती मंचच्या मागणीचे दखल घेत मध्य रेल्वेने ऋषिकेश, हरिद्वार, प्रयागराज, जबलपूर, मुगलसराय, पटना, दिल्ली, मथुरा, जाण्यासाठी व परत येण्यासाठी चार उन्हाळी विषेश रेल्वे गाड्यांना सांगलीचा थांबा मंजूर केला आहे.

सांगली स्थानकासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीत प्रत्येक फेरीसाठी सहाशेपेक्षा जास्त तिकिटांची भरीव उपलब्धता सांगली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी झाली आहे. मध्य रेल्वेने हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसला गाडी व बिहार जाणाऱ्या हुबळी-प्रयागराज-मुझफरपूर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना व परतीच्या दोन गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर केला आहे.
हुबळी-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस (गाडी क्र. ०७१५), मुजफ्फरपूर ते हुबळी (गाडी क्र. ०७१६), हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेस (गाडी क्र. ०६२२५), ऋषिकेश ते हुबळी (गाडी क्र. ०६२२६) अशा गाड्यांची उपलब्धता येथील प्रवाशांसाठी झाली आहे. हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, विटा, तासगाव, आष्टा, इस्लामपूर येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमध्ये स्लीपर क्लासची ५००, तर एसी स्लीपर क्लासची १०० अशी एकूण ६०० तिकिटांची उपब्लधता आहे. प्रवाशांनी आताच तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप व नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

हुबळी-ऋषिकेश मंगळवारी येणार
हुबळी-हरिद्वार-ऋषिकेश विशेष रेल्वे गाडी सांगलीतून मंगळवारी पहाटे ३.३५ वाजता रवाना होईल. त्यानंतर सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडोबा, भोपाळ, बिना, झांसी, मथुरा, दिल्ली, निजामुद्दीन, गाझियाबाद, मिरज सिटी, खटवली, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकी या ठिकाणाहून बुधवारी दुपारी ४.१० वाजता हरिद्वाराला जाईल. तिथून पुढे ऋषिकेशला सायंकाळी ६:४५ला पोहोचेल.
ऋषिकेशहून रविवारी सांगलीत येणार

ऋषिकेश-हरिद्वार-हुबळी अशा परतीच्या मार्गावर जाताना हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५:५५ वाजता सुटून हरिद्वार येथे सायंकाळी ६:५८ला येईल. तिथून पुन्हा त्याच मार्गावरून धावत ही गाडी रविवारी सकाळी ११.२७ वाजता सांगलीत दाखल होईल.

हुबळी-मुजफ्फरपूर १० रोजी सुटणार
हुबळी-प्रयागराज-मुझफ्फरपूर एक्सप्रेस सांगली स्टेशनवरून सोमवारी १० मार्चला रात्री साडेअकरा वाजता सुटेल. सांगलीतून बसून पुणे, मनमाड, भुसावळ, ईटारसी, जबलपूर,(पचमढी), कटनी, सतना, प्रयागराज, पाटलीपुत्र (पटना), मुगलसराय जाता येईल

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.