Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समग्र शिक्षा अभियान संघर्ष कंत्राटी कर्मचाऱ्याचां एल्गार आझाद मैदानावर दणणार!

समग्र शिक्षा अभियान संघर्ष कंत्राटी कर्मचाऱ्याचां एल्गार आझाद मैदानावर दणणार!
 


सांगली: महाराष्ट्रातील समग्र शिक्षाअतंर्गत गेल्या १८ते २०वर्षापासून काम करणाऱ्या तीन हजाराहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ‘आम्हाला कायम करून घ्या, नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या’; या मागणीसाठी ४ मार्चपासून काम बंद आंदोलन जाहिर केले आहे, मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा समग्र शिक्षा संघर्ष समितीने दिला आहे. या आंदोलनात सांगली जिल्हयातील १०० हून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती समग्र शिक्षा संघर्ष समितीचे सांगली  जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पाटील,  धनंजय भोळे,  प्रदीप कदम,  प्रशांत शेटे,  उमेश पाटील,  गणेश पुजारी,  अर्जुन चव्हाण,  संतोष ढवळे यांनी दिली.

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नसतील, तर कंत्राटी सेवापूर्तीनंतर शासनाने इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी समितीच्या अध्यक्षा योगिता बलाक्षे यांनी केली आहे. समग्र शिक्षा अंतर्गत २००३ पासून जिल्हा, तालुका आणि महापालिका स्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी, विषय साधन व्यक्ती,, डाटा एण्ट्री ऑपरेटर, एम आय एस कॉर्डिनेटर,  दस्तऐवज व संशोधन सहायक आणि कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखा सहायक अशा विविध पदावर कंत्राटी पद्धतीवर अनेक कर्मचारी काम करत आहेत. शालेय शिक्षणविषयक प्रशिक्षण देणे, शाळाभेट करून आदर्श पाठ घेणे, विद्यार्थी मार्गदर्शनासह शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणविषयक योजना राबवणे, जिल्हा परिषद व मनपा क्षेत्रातील माहितीचे संकलन व संश्लेषण करणे इत्यादी कामे हे कर्मचारी करतात. 
 
आता या कर्मचाऱ्यांनी सरकारला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार व अर्हतेनुसार रिक्त पदांवर किंवा आहे त्याच पदांवर कायम करण्याच्या मागणीसाठी राज्य व्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या कायम मागणीसाठी   वेळोवेळी आंदोलन, उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याची खंतही कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ‘तुटपुंज्या वेतनावर समग्र शिक्षा मधील कर्मचारी राबतआहेत. शासनाच्या निवड प्रक्रियेतूनच त्यांची निवड करण्यात येते. मात्र, त्यांना कोणताही शासकीय लाभ देण्यात येत नाहीत. तसेच  समग्र शिक्षा मधील निम्म्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले आहे, मात्र  उर्वरित लोकांवरच अन्याय का?   या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करून घेण्यात यावे,’ अशी मागणी  कर्मचाऱ्यांनी केली आहे.
     


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.