Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐश्वर्या रायच्या गाडीला बसची जोरदार धडक

ऐश्वर्या रायच्या गाडीला बसची जोरदार धडक
 

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐश्वर्याच्या लग्जरी कार टोयोटा वेलफायरचा अपघात झाला आहे. एका बसने ऐश्वर्याच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे. गाडीला बसने मागून धडक दिली असून सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऐश्वर्याच्या कारला एमएसआरटीसीच्या बसने मागून धडक दिल्याचं दिसतय. गाडीजवळ ऐश्वर्याचे बॉडीगार्ड देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतय की, अपघातानंतर गाडीला बाजूला करण्यात येत आहे.

पैपराजी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्याची कार लाल रंगाच्या बसच्या समोर दिसून येत आहे. गाडीभोवती लोकांची गर्दी जमा झालीय. सुदैवानं गाडीचं जास्त नुकसान झालेलं नाही. गाडीमध्ये कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. परंतु व्हिडिओ बघून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांकडून ऐश्वर्याबद्दल विचारण्यात येत आहे. एश्वर्या सुखरुप आहे ना? अशी विचारणा चाहत्यांकडून केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.