राहुल गांधींचा अचानकपणे आज धारावी दौरा, निशाण्यावर कोण? चर्चांना उधाण
मुंबई: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज धारावी दौऱ्यावर असणार आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसची बैठक आहे. त्याआधी राहुल गांधी मुंबईतील धारावीला भेट देणार आहेत. या ठिकाणी चर्मोद्योग व्यावसायिकांना भेट देणार आहेत आणि संवाद साधणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा होत असताना दुसरीकडे राहुल गांधी थेट धारावीत जाणार आहेत.
काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी 6 ते 8 मार्च 2025 दरम्यान मुंबई आणि अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते पक्षाचे स्थानिक अस्तित्व बळकट करणे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तर, मुंबईतील राहुल गांधींच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. धारावीत राहुल गांधींची चर्मोद्योगातील कामगारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा होणाऱ्या परिणामाबाबतही संवाद साधणार आहेत. तर, विमानतळावर काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्प मुद्यावर राहुल गांधी आक्रमक...
धारावी पुनर्विकास प्रकल्प मुद्यार राहुल गांधी हे सुरुवातीपासून आक्रमक आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटानेही विरोध केला आहे. तर, स्थानिकांमध्येही पुनर्वसन आणि इतर मुद्यांवर आक्रोश आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना चांगली घरे, पायाभूत सुविधा मिळणार अस्ल्याचा दावा करण्यात येणार आहे. धारावीत चर्मोद्योगासह इतरही विविध लघुउद्योग आहे. धारावीत अब्जावधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या लघुद्योगांचे पुनर्वसन कुठं करणार, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर, स्थानिकांमध्ये पात्रतेच्या मुद्यावर चिंता समोर येत आहे. अशातच आता राहुल गांधी धारावीच्या दौऱ्यावर येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.