Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरपंच राजेश पडळकर यांना मारहाण; कवठेमहांकाळ ठाण्यातील पोलीसाला निलंबित करा

सरपंच राजेश पडळकर यांना मारहाण; कवठेमहांकाळ ठाण्यातील पोलीसाला निलंबित करा
 

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीमंत करे यांनी रायवाडीचे सरपंच राजेश पडळकर यांना नाहक अमानुषपणे मारहाण केली. करे यांना तत्काळ निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन सरपंच संघटनेने पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना दिले.

मारहाणीची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. सरपंच संघटनेचे नेते प्रदीप माने व तालुकाध्यक्ष अरुण भोसले यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तहसील व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला आणि माने तसेच भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळ पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना भेटून करे यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. अमर शिंदे, नामदेव पाटील, प्रवीण पवार, तानाजी शिंद, यांनी शासकीय शासकीय कार्यालय मध्ये सरपंचांना अपमानास्पद वागणूक मिळते, याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी केली.

पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व सहकारी यांचे सात दिवसांच्या आत निलंबन करावे, अन्यथा सरपंच व पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करतील. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तानाजी यमगर, संपत नरळे, नितीन कांबळे, तुकाराम शिंदे, सहदेव गुरव, दीपक कांबळे, गोरख खोत, शिवदास भोसले यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

६ मार्चरोजी रायवाडी गावचे सरपंच राजेश काशिनाथ पडळकर हे त्यांच्या कामानिमित्त पंचायत समिती येथे आले होते. यावेळी त्यांना फोन करून श्रीमंत करे यांनी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. आणि पडळकर यांना धमकावत तुला ३०७ या केस मध्ये अडकवतो. नाही तर तुला यातून बाहेर पडायचे असेल, तर २ लाख दे, अशी मागणी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.