Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जितेंद्र आव्हाडांना अटक झाली का?, दोन्ही हातात बेड्या का घातल्या? नक्की काय घडलं?

जितेंद्र आव्हाडांना अटक झाली का?, दोन्ही हातात बेड्या का घातल्या? नक्की काय घडलं?
 

व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांचे आवाज Ship केले जात आहेत.  अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. आम्हाला स्वातंत्र आहे. बोलण्याचं. ते हिरावून घेतलं जात आहे. त्यामुळे मी हातात हातकड्या घालून या गोष्टींचा निषेद करतोय असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. ते विधिमंडळपरिसरात माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात विरोधकांना व्यक्त होऊ दिलं जात नाही. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. आमचे मुलभूत अधिकार दडपले जात आहेत. अमेरिका आपला बाप नाही. आम्हाला व्यक्त होऊ दिलं जात नाही. अमेरिकेनं ज्या पद्धतीनं भारतीयांना वागणूक दिलीय ते चुकीचं आहे.

आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होते वाल्मिक कराडनेच हत्या केलीय पण सरकारला ऐकायचं नव्हतं. वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असेल तर तो माझा जवळाचा माणूस असे जे म्हणाले होते ते कुठे आहेत. मला बेड्या या जेलरने दिल्या. अश्या बेड्या घालून येणे योग्य आहे का विधानभवनात? विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी तुम्ही माझा अभिव्यक्तीचा अधिकार काढून घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

दुसरीकडे विधिमंडळात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरण यासह मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल.राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडक पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.