Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-औरंगजेब उदात्तीकरणास विरोध करणाऱ्या हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना नोटीस

सांगली :- औरंगजेब उदात्तीकरणास विरोध करणाऱ्या हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना नोटीस
 

सांगली : औरंगजेबचे उदात्तीकरण रोखण्यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाचा इशारा देणार्‍या हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना तीन दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश बंदी लागू करण्यात आली असून पोलीसांनी प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांना रविवारी नोटीस बजावली.

औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखले जावे, खुलताबाद येथे सुरू असलेल्या उरूसावर बंदी घालावी या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने मंगळवार दि. ११ मार्च रोजी चलो संभाजीनगरची हाक दिली होती. या पार्श्‍वभूमीवर छ. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हिंदू एकता आंदोलनच्या कार्यकर्त्यांना तीन दिवस जिल्हा बंदी जाहीर केली आहे. यासंदर्भातील अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या स्वाक्षरीची नोटीस प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांना रविवारी सांगली पोलीसांनी बजावली.

दरम्यान, श्री. शिंदे यांनी ही नोटीस स्वीकारत असताना सांगितले, औरंगजेबाच्या कबरीवर गलेफ, फूल, चादर चढविण्यासाठी राजकीय नेत्यांना बंदी घालावी या मागणीसाठी संघटनेच्यावतीने सांगलीत आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी हिंदू एकता आंदोलनचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, विष्णुपंत पाटील, अविनाश मोहिते, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रसाद रिसवडे, मनोज साळुंखे, रवी वादवणे, अरुण वाघमोडे, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.