देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती पीटीआयने दिलीय.
जगदीप धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मध्यरात्री दोन वाजता रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डियॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाहीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड यांना मध्यरात्री रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.