Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्रायली महिलेसह दोघींवर अत्याचार; कर्नाटकातील घटना

इस्रायली महिलेसह दोघींवर अत्याचार; कर्नाटकातील घटना


कोप्पल (कर्नाटक) :
हंपीजवळ रात्री ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी (आकाशदर्शन) आलेल्या २७ वर्षीय इस्रायली महिला पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार अन् त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यासह असलेल्या तीन पुरुष पर्यटकांवरही हल्ला करण्यात आला आणि त्यांना कालव्यात ढकलण्यात आले. त्यापैकी एक मृत झाल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, परंतु ओळख पटलेल्या तीन संशयितांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ही घटना घडली. एक २९ वर्षीय पर्यटकांची घरगुती निवासव्यवस्था करणारी महिला भोजनानंतर इस्रायली महिला पर्यटकासह अन्य तीन पुरुष पर्यटकांना घेऊन तुंगभद्रा नदीच्या कालव्याच्या डाव्या किनाऱ्याजवळ गेली होती. पुरुष पर्यटकांपैकी एक जण अमेरिकेचा नागरिक आहे. अन्य दोघे ओडिशा आणि महाराष्ट्राचे आहेत. या घरगुती निवासव्यवस्था करणाऱ्या महिलेने तक्रारीत नमूद केले, की ते आकाशदर्शन व संगीताचा आनंद लुटत असताना तीन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी 'पेट्रोल कुठे मिळेल' अशी विचारण्याचा बहाणा केला.

येथे कुठेही पेट्रोल पंप नसून, तुम्हाला सनापूरमध्ये पेट्रोल मिळेल,' असे मी त्यांना सुचविले. या आरोपींनी तिच्याकडे १०० रुपयांची मागणी केली. त्या व्यक्ती अनोळखी असल्याने तिने त्यांना आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. या तिन्ही आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तिघांनी घरगुती निवासव्यवस्था करणाऱ्या तक्रारदार महिलेवर आणि इस्रायली महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार केला आणि पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलून दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 


 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.