सांगली :- सांगली येथील प्रतित यश चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या बी. कॉम व एम. कॉम विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट देवून दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन संस्थेच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम हे उपस्थित होते.
यावेळी कॉलेजच्या वतीने प्रा. सौ. स्नेहा वैभव छत्रे व प्रा. अनुराधा बाबासाहेब कवठेकर या विद्यार्थ्यांच्या सोबत हजर होत्या. शाखा कामकाजापासून ते मुख्यालयाचे कामकाज यासह कायदेशीर कामकाज संगणकीय माहिती व संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे सविस्तर सादरीकरण प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यासाठी संस्थेच्यावतीने श्री. संजय सासणे, हर्षद कमते व भरत ऐतवडे यांनी केले.प्रा. सौ. स्नेहा वैभव छत्रे यांनी संस्थेने विद्यार्थ्याना अतिशय सविस्तर माहिती दिली आज पर्यत आम्हाला पुस्तकी माहिती होती पण आज प्रत्यक्ष माहिती मिळाली त्यासाठी आपला पुर्ण वेळ दिवून सविस्तर माहिती दिली त्यामुळे यापुढे आधिक विद्यार्थ्यांना घेवून आम्ही याच संस्थेला भेट देवू ही भावना व्यक्त केली व संस्थेने अत्यंत आदरातिथ्य दाखवून माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.