Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जीएसटी विभागाच्या उपायुक्तांनी संपवलं जीवन, १४ व्या माळ्यावरून उडी मारली आणि...

जीएसटी विभागाच्या उपायुक्तांनी संपवलं जीवन, १४ व्या माळ्यावरून उडी मारली आणि...
 

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे जीएसटी विभागात उपायुक्त असलेल्या संजय सिंह यांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

५९ वर्षीय संजय सिंह हे अचानक इमारतीच्या १४व्या मजल्यावर पोहोचले आणि तिथून उडी मारून त्यांनी त्यांचे जीवन संपवले. ही घटना गाझियाबादमधील सेक्टर ११३ परिसरातील सेक्टर ७५ स्थित अॅपेक्स अँटिना सोसायटीमध्ये घडली. संजय सिंह हे कर्करोगग्रस्त होते. तसेच दीर्घकाळापासून मानसिक तणावाची शिकार झालेले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.