Kolhapur: बायकोच्या कृत्यामुळे शेखर आगीचा गोळा बनून पोलीस स्टेशनमध्ये धावत आला, इचलकरंजीतील भयानक घटना
इचलकरंजी बायकोनं घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्यामुळे एका तरुणानेपोलीस ठाण्याच्या आवारातच एका तरुणाने पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना इचलकरंजीमध्ये घडली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली. पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार, इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात ही घटना घडली. शेखर गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण 60 टक्के भाजल्याचं निष्पन्न झालं असून त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवलं आहे. या घटनेमुळं पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.
सोल्हापूर जिल्ह्यातील करकंब, अकलुज इथं राहणारा शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे. त्याची पत्नी सद्या सासरवाडीत राहत होती. ती सोडचिठ्ठी होण्यापूर्वीच दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली. त्यामुळं तो आज सासरवाडी येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता. यातून त्यांच्यात भांडण झालं. त्यामुळे शेखरनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांसमोर त्यानं आपली कैफीयत मांडली. पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला मात्र त्यानं अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं.
बघता बघता अंगावरील कपडे पेटल्यानं जीव वाचवण्याच्या आकांतानं तो सैरभैर पळु लागला. वाचवा, वाचवा म्हणत त्यानं पोलीस ठाण्यातही प्रवेश केला. यावेळी पोलीस आणि नागरीकांनी त्याच्या अंगावर माती टाकून पाण्यात उडी घेण्याचा सल्ला दिला. तरीही त्यानं पेटलेल्या स्थिती पोलीस गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींनी स्वतःचे कपडे काढून त्याला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली. त्यामुळे आग आटोक्यात आली. अखेर त्याला पोलिसांनी आपल्या गाडीत आयजीएम रुग्णालयात आणलं. प्राथमिक उपचारात 60 टक्के भाजल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र पत्नी किंवा सासरवडीतील नातेवाईक आल्याशिवाय पुढील उपचार न घेण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. अखेर त्याला पोलिसांनी सीपीआर रुग्णालयाकडं नेलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.