अंत्यसंस्कारानंतर अस्थी 3 दिवसांनीच विसर्जित का करतात?
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. यालाच अंत्यसंस्कार म्हणतात. अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख विसर्जित करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळे आत्म्याला शांती मिळते. अस्थी विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचे पवित्र नदीत विसर्जन करणे. शास्नांमध्ये, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखेचे विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का अंत्यसंस्कारानंतर फक्त तीन दिवसांनी राख का गोळा केली जाते? गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतर तिसन्या, सातव्या किवा नवव्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी राख गोळा करणं सर्वात योग्य आहे. कारण मंत्रांचा जप केल्याने आकाश आणि तत्वांच्या एकत्रित लहरी अस्थीमध्ये संक्रमित होतात.
कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्तींचं सावट अस्थींवर पडू नये म्हणून, अस्थी तीन दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकावीत. मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्ग्री आणि आकाश यांनी बनलेले आहे. अंत्यसंस्कारानंतर शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होते. अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी, अस्थी एकत्र गोळा करतात. आणि धातू किवा मातीच्या भांड्यात ठेवली जातात. नंतर, योग्य तारीख पाहिल्यानंतर, ही अस्थी पवित्र नदीत विसर्जित केली जाते. राखेचे विसर्जन केल्यानंतर, मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होतात अशी मान्यता आहे.(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून सांगली दर्पण कोणताही दावा करत नाही.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.