मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक कामगिरी, भोसले घराण्याची तलवार महाराष्ट्रात येणार; सरकारने मोजले तब्ब्ल 47 लाख
नागपूर : नागपूर येथील भोसले घराण्याची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्विट करत दिली आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावात राज्य सरकारने ही तलवार 47.15 लाख रुपयांनी खरेदी केली आहे.
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 'सेनासाहिबसुभा' ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी 1745 च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता.
दक्षिण भारतात देखील त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.
ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा' असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे.
तलवारीला सोन्याने जडवलेली मूठ
संबंधित तलवार ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर तिला सोन्याने जडवलेली मूठही आहे. तसेच हिरव्या विणलेल्या लोकरीची पकडही तलवारीला आहे. या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार १२४ सेमी लांब आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.