धक्कादायक! आकाशातून कोसळला चक्क 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; नागपूरच्या उमरेडमध्ये एकच खळबळ
नागपूर जिल्ह्याचा उमरेड मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात उमरेडच्या कोसे लेआऊट परिसरात शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास धातूचा मोठा तुकडा एका घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मोठा स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. आवाज येताच परिसरातील अनेक लोकं घाबरून घराबाहेर निघाले. या घटनेत अमेय बसेशंकर यांचा घरावर धातूचा तुकड पडल्यानं छतावरील भिंतीचा काही भागही तुटला आहे.
दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर धातूचा तुकडा कशाचा आहे हे अद्याप कळू न शकल्याने पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. हा तुकडा पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे. तर हा तुकडा 50 किलो वजनाचा असून, अंदाजे 10 ते 12 MM जाडीचा आणि 4 फूट लांब असल्याची माहिती पुढे आली आहे. चक्क आकाशातून कोसळला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा पुढे आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सारे साखरझोपेत असताना उमरेडच्या कोसे लेआऊट परिसरात अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊन घराबाहेर धूम ठोकली. मात्र नंतर तपासणी केली असता अमय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर एक भला मोठा तुकडा कोसळला असल्याचे समजून आलं.
हा धातूचा तुकडा अवकाशातून कोसळला असावा, असा अंदाज नागरिकांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्या नंतर पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान एक जाड लोखंडी पत्रा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत घराच्या स्लॅबवर पडलेला दिसून आला. यावेळी धातूचा तुकडा छतावर पडल्यानंतर काही नागरिकांनी तो पत्रा बघितला असता हा धातूचा तुकडा गरम असल्याचे आढळून आलंय. यात भिंतीचा काही भागही तुटला आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस आता पुढील तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.