Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सौदीच्या वाळवंटात 8 दिवस अडकलेल्या कुटुंबाचा बचाव

सौदीच्या वाळवंटात 8 दिवस अडकलेल्या कुटुंबाचा बचाव


रियाध : भीषण तापमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामधील हलबन वाळवंटात एक सौदी कुटुंब तब्बल आठ दिवसांपर्यंत अडकून पडले होते. वाहन वाळूत अडकल्यामुळे सुरू झालेली ही अडचण भयंकर जीवघेण्या संघर्षात बदलली होती. अन्न-पाण्याशिवाय राहिलेल्या कुटुंबाने गाडीच्या रेडिएटरमधील पाणी पिले आणि खुरट्या झाडांची पाने खाऊन जगण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचा वेळीच शोध घेऊन, त्यांचा बचाव करण्यात यश आले.


ही घटना रियाधपासून 239 कि.मी. अंतरावरील हलबन वाळवंटात घडली. या भीषण परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर एनजाद या गैर-सरकारी बचाव संस्थेने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. एनजादला वाळवंटी भागांतील हरवलेल्या लोकांच्या शोधात विशेष कौशल्य आहे. त्यांनी या शोध मोहिमेसाठी 40 बचाव पथकं आणि ड्रोन व डिजिटल मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. 


हे ऑपरेशन 24 तासांहून अधिक काळ चालले. तपासादरम्यान ड्रोनच्या मदतीने वाळवंटातील एका भागात कुटुंबाच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले. एनजादच्या पथकांनी त्या भागात पिनपॉईंट करून शोधमोहीम तीव- केली. कुटुंबातील सदस्यांचे शरीर पूर्णतः डीहायड्रेट झालेले होते. मात्र, त्यांच्या बचावासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरले. सर्व सदस्य सुरक्षितरीत्या बाहेर काढले गेले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.