कोल्हापूर :- खरेदी कोणाकडून करायची याविषयीचे वादग्रस्त फलक आज कोल्हापूरमध्ये झळकले. हिंदू व्यापाऱ्यांकडून आवर्जून खरेदी करावी असा संदेश देणाऱ्या या फलकावर अल्पसंख्यांकांना लक्ष्य केल्याचे दिसते. नाव विचारूनच बाजारात खरेदी करा, अशा आशयाच्या फलकाची कोल्हापुरात चर्चा रंगली आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील पेहलगाम येथे २७ पर्यटकांवर गोळीबार करून अतिरेक्यांनी जीव मारले. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. कोल्हापूर शहरात हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना ठाकरे गट, मुस्लिम समाज, इंडिया आघाडी, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्ष - संघटनांकडून या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे हिंदूंवरील या हल्ल्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. आज कोल्हापुरात सकल हिंदू समाजाने लावलेल्या फलकावरून चर्चेला वेगळा संदेश पेरण्याचा प्रयत्न झाला आहे.
धर्म विचारूनच मारले. त्यामुळे आता यापुढं तुम्ही किमान नाव विचारूनच मार्केट मध्ये सुद्धा खरेदी करा, अशा आशयाचा फलक कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे. सकल हिंदू समाजाकडून हा फलक लावण्यात आला आहे. ज्यामध्ये 'छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारलं.. आणि आता सुद्धा आपल्या २७ हिंदू बांधवांना धर्म विचारून मारले गेले. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदी करताना नाव विचारूनच करा, असा आशय असणारा हा फलक मध्यवर्ती जागेवर लावण्यात आला आहे. शंभर टक्के आर्थिक बहिष्कार टाका असाही संदेश याद्वारे देण्यात आला आहे. अशा या फलकाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.