Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मैत्रिणीनेच ढकलले वेश्याव्यवसायात; ५ लाखांमध्ये केला सौदा

मैत्रिणीनेच ढकलले वेश्याव्यवसायात; ५ लाखांमध्ये केला सौद


 

पुणे : मैत्रिणीबरोबर बांगलादेशची सीमा बेकायदा ओलांडून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पुण्यात मोठी आपबीती ओढवली. या मुलीला मैत्रीणीनेच पाच लाख रुपयांना बुधवार पेठेतील एका कोठेवालीला विकले. यानंतर कोठेवालीने 'तू बांग्लादेशी असल्याचे पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करेल' अशी धमकी देत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. पाच महिन्यात झालेल्या अत्याचराला वैतागून तरुणीने कशीबशी स्वतःची सुटका करीत पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पाच महिलांवर गुन्हे दाखल झाले असून, एका महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १६ वर्षे दोन महिन्यांची आहे. तिला बांग्लादेशातून मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवत पुण्यात आणले. यासाठी तिने बांग्लादेशातून नदीमार्गे बेकायदा भारताची सीमा ओलांडली. पुण्यात आल्यावर त्या भोसरीमध्ये सात ते आठ दिवस राहिल्या. यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठेत आणले. तिथे तिला एका महिलेला पाच लाखांत विकले. यानंतर महिलेने तिला तुळशीबाग आणि बुधवार पेठेतील कोठ्यात ठेवले. तिला पोलिसांत देण्याची धमकी देत वेश्याव्यवसाय करण्यात भाग पाडले. पीडितेला अत्याचार सहन होत नव्हते. मात्र, तिला खोलीतून बाहेर पडू दिले जात नव्हते.

पाच महिने अत्याचार सहन केल्यावर तिने एकदा सुटकेचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. मात्र, ती सात एप्रिलला कशीबशी खोलीतून बाहेर पडली. तिने बस, रिक्षा पकडत हडपसर गाठले. तेथे हडपसर पोलीस ठाण्याची माहिती मिळताच तेथे धाव घेत तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल करीत एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.