शेतात लक्ष्मी म्हणून पूजले जाणारे झाड खरच ठरले 'पैशाचे झाड', पुसद मधील शेतकरी झाला कोट्याधीश
पुसद: महाराष्ट्रातील पुसद तालुक्यातील खर्शी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील दुर्मिळ लाल चंदनाच्या एका झाडचे तब्बल 5 कोटी रुपये मिळणार आहे. नांदेड़ वर्धा रेल्वे मार्गसाठी शिंदे यांची जमिन अधिग्रहित केली जाणार आहे. दरम्यान, त्या भागातील प्रत्येक झाडाचे ऑडिट करण्यात येत आहे. त्यात पंजाबराव शिंदे यांच्या शेतात लावलेले लाल चंदनाचे झाड राज्यातले एकमेव सर्वात मोठे रक्तचंदनाचे झाड़ असल्याचे वनविभागाने म्हटले आहे. त्यामुळे या झाडाचा मोबादला म्हणून शिंदे कुटुंबियांना तब्बल 5 कोटी रुपये मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
शेतकरी पंजाबराव शिंदे यांच्या आजोबांनी एक झाड शेतात आणून लावले होते, झाड़ नेमके कश्याचे आहे हे त्यांना माहित नव्हते. पण ‘लक्ष्मीच झाड’ म्हणून शिंदे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षापासून त्या झाडाची पूजा करत होते. दरम्यान, आता हेच लक्ष्मी म्हणून पूजले जाणारे झाड शिंदे कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मी’ ठरले आहे.
न्यायालयाने शेतकऱ्याला तातडीने ५० लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. झाडाची अंतिम किंमत निश्चित करण्यासाठी त्याचे पुढील मूल्यांकन केले जाणार आहे. लाल चंदनाचे झाड ही एक अत्यंत मौल्यवान प्रजाती आहे, जी त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. शेतकरी पंजाब राव शिंदे यांनी दावा केला की, या झाडाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ते विविध आजार बरे करू शकतात. यासाठी या झाडाची 2-3 पाने कच्ची खावी लागतात. त्यांनी असेही सांगितले की, ही पाने गायीला दिल्यास दूध उत्पादन वाढवण्यास मदत होते. दरम्यान, झाडाच्या किमतीचे मुल्यांकन केल्यानंतर शासनाकडून अधिक किमत मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.